
Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | तब्बल 20 महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्यांनी गजबजणार ! जिल्हा प्रशासनाकडून कार्तिकी यात्रेस परवानगी
पंढरपूर : Pandharpur Kartiki Ekadashi Yatra | कोरोना महामारीमुळे गेल्या २० महिन्यांपासून बंद असलेल्या यात्रांना आता परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. यंदा कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे. आषाढी आणि कार्तिकी हा दोन मोठ्या यात्रा असतात. आषाढी यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली होती.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (solapur collector milind shambharkar)
यांनी कार्तिकी यात्रेला (Pandharpur Kartiki Ekadashi Yatra) परवानगी दिली आहे. त्यामुळे जवळपास २० महिन्यांनंतर पंढरपूर पुन्हा एकदा वारकर्यांनी गजबजणार आहे.
प्रांताधिकारी गजानन गुरव (Gajanan Gurav) यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरविण्यासाठी दाखविलेली तयारी लक्षात घेऊन ही परवानगी देण्यात आली आहे. परंपरेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शासकीय महापूजा, भाविकांचे दर्शन, नैवेद्य, रथोत्सव, महाद्वारकाला आदी कार्यक्रम यावेळी होणार आहे. कार्तिक यात्रेला साधारण अडीच ते ३ लाख वारकरी पंढरपूरला येत असतात. त्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्या आहेत.