पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी NCP काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील १९ फेर्‍या पूर्ण झाला असून त्यात भाजपच्या समाधान आवताडे यांनी जवळपास १ हजार मतांची आघाडी घेतली आहे. आता आवताडे यांचा बालेकिल्ला असलेल्या मंगळवेढा भागातील मतमोजणी बाकी राहिली आहे. सध्याच्या मतमोजणीचा कल लक्षात घेता मंगळवेढा तालुक्यात आवताडे यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आता राष्ट्रवादी NCP काँग्रेसच्या हातातून निसटल्यात जमा आहे.

पंढरपूर तालुक्यात मोठी आघाडी घेऊन विजय मिळविण्याचा राष्ट्रवादी NCP काँग्रेसचा आजवर प्रयत्न राहिला आहे. मात्र, पंढरपूर तालुक्यातच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पंढरपूर शहरात भाजपला आघाडी मिळाली आहे.

मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या ५ फेर्‍यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके हे आघाडीवर होते. परंतु, ही आघाडी खूपच मामुली होती. त्यानंतर समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली. त्यांच्या आघाडीत प्रत्येक फेरीअखेर थोडाफार फरक पडत असे. परंतु, आवताडे यांची आघाडी प्रत्येक फेरीत कायम राहिली आहे.

आता २० ते ३८ फेरीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील मतमोजणी होणार आहे. मागील निवडणुकीत या तालुक्यात समाधान आवताडे यांना चांगली मते मिळाली होती. यंदा त्यांनी मंगळवेढ्याचा सुपुत्र असा प्रचार केला आहे. त्यामुळे या तालुक्यात त्यांना चांगली मते मिळण्याची शक्यता आहे. अजून जवळपास निम्मी मतमोजणी बाकी आहे. समाधान आवताडे यांना त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात मोठी आघाडी मिळाली तर तो राष्ट्रवादी NCP काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.

READ ALSO

Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची मुसंडी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर

पंढरपूर पोटनिवडणूक : ट्रेंड बदलला ! भाजपच्या समाधान आवताडेंनी घेतली मोठी आघाडी

IMP NEWS – Gold Price Today : आठवडाभरात 3400 रुपयांनी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या पुढे आणखी स्वस्त होईल की, येईल तेजी…?