धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे राष्ट्रवादीच्या नेत्यासह कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे पंढरपूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजू बापू पाटील यांचे सोलापूर येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचेचुलते, धाकटे बंधु आणि आता राजू बापू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

राजू बापू पाटील यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची बाधा झाली होती. उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते नजीकचे आणि विश्वासू सहकारी होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी वलय निर्माण केले होते.

नुकताच त्यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पवार यांच्या शिफारशीवरून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती, यापूर्वी त्यांचे वडील कै. यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य पद भूषवले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like