Pandharpur NCP | काय सांगता ! होय, NCP च्या पदाधिकार्‍यानेच केली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात ईडीकडून (ED) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) मंत्री आणि नेत्यावर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pandharpur NCP) एका नेत्याने आपल्याच नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार केल्याचे समोर आले आहे. पंढरपूर मधील राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात (Pandharpur NCP) पदाधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Pandharpur NCP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी विक्री केलेल्या सीताराम साखर कारखान्याबद्दल (Sitaram Sugar Factory) राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार (Adv. Deepak Pawar) यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्यामध्ये कल्याण काळे यांच्यासह संचालक व कार्यकारी संचालक यांनी हजारो लोकांची आर्थिक (fraud) फसवणूक केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

 

35 कोटींचा अपहार

 

2010 ते 2015 या कालावधीत सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ऊस दिलेल्या शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक,
व्यापारी व शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून शेअर्स देतो म्हणून तब्बल 35 कोटी रुपये गोळा केले आहेत.
हे पैसे घेतल्यानंतर अनेकांना पावत्याही दिल्या नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे.

 

शेअर्सपोटी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. मात्र, फक्त वाडीकुरोली, पिराचीकुरोली आणि धोंडेवाडी या तीन गावातील 4952 शेतकऱ्यांची नावे शेअर्सच्या यादीत समाविष्ट केली.
इतर शेतकऱ्यांनी भरलेल्या पैशाचे काय ? त्यांची नावे का नाहीत? त्यांनी भरलेली रक्कम कुठे गेली? त्यांची चौकशी करण्याची मागणी ईडी आणि इन्कम टॅक्स विभागाकडे (Income Tax Department) केली आहे. तसेच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Web Title : Pandharpur NCP | the ncp leader lodged a complaint against kalyan kale with the ed in pandharpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Chinchwad RTO Office | शनिवार-रविवारी देखील पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्ससाठी चाचणी

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’