Pandharpur News | विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना विषबाधा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pandharpur News | मुंबईवरून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या ३० पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. चंद्रभागा नदीकाठच्या असणाऱ्या एका हॉटेलमध्ये हे भाविक जेवले होते. जेवणानंतर या भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही भाविक गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. (Pandharpur News)

 

नगरपालिका व जिल्हा आरोग्य विभागाची टीम या घटनेची माहिती मिळताच सतर्क झाली. शिवाय विठ्ठल मंदिर समितीचे पदाधिकाऱ्यांचेही या घटनेकडे लक्ष आहे. दरम्यान, अन्न व औषध विभागाची टीमही पंढरपुरात दाखल झाली आहे. स्थानिक पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

 

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज पंढरपुरात येतात. इथे येऊन चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी पंढरपुरात अनेक हॉटेल आहेत. एखाद्या हॉटेलच्या जेवणामुळे विषबाधा होणे, ही गंभीर आहे. (Pandharpur News)

 

Web Title :- Pandharpur News | 30 devotees who came to see vitthala at pandharpur were poisoned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार