Pandharpur News | देवाच्या लग्नाला पावणे दोन कोटींचा सोन्याचा आहेर; सोन्याचे दोन मुकुट, सोन्याच्या बांगड्या, सोन्या -चांदीचे रुखवताची भेट

0
1113
Pandharpur News | devotee donated jewellery worth two crore at vitthal rukmini temple in pandharpur
file photo

पंढरपूर : Pandharpur News | गरिबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला एका भाविकाने तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने (Gold and Silver Jewellery) अर्पण केले आहेत. (Pandharpur News)

विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाह (Vitthal Rukmini Marriage) सोहळा गुरुवारी होत आहे. याविवाह सोहळ्याच्या निमित्ताने जालन्यातील एका भाविकाने सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे दोन सोन्याचे मुकुट, सोन्याच्या बांगड्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. याबरोबरच विवाह सोहळ्यासाठी सोन्या -चांदीचे रुखवतही भेट देण्यात आले आहे.

जालना येथील एका भाविकाने हे गुप्त दान विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले आहे. गेल्या ५० वर्षातील सर्वात मोठे दान विठ्ठलाचा चरणी अर्पण झाले आहे. (Pandharpur News)

या गुप्त दानामध्ये विठ्ठल रुक्मिणी याना सोन्याचे मुकुट, विठ्ठल रुक्मिणी मातेला मोहनमाळ,
रुक्मिणी मातेला कोल्हापुरी साज, पाटल्या, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी असे सोन्याचे दागिने दिले.
देवाच्या नित्योपचारासाठी चांदीचे मोठे ताट, वाटी, समई, तांब्या भांडी, ताम्हण, पळी, मोठा देवाचा चांदीचा आरसा अशा किंमती वस्तू अर्पण केला असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Vitthal Rukmini Temple) समितीच्या वतीने श्री विठ्ठल
व रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात तसेच मंदिरात फुलांपासून सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.

Web Title :- Pandharpur News | devotee donated jewellery worth two crore at vitthal rukmini temple in pandharpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम