Pandharpur News | माघी वारीत उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यानं वारकर्‍यांना विषबाधा, 137 भाविक रूग्णालयात

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – माघी यात्रा सोहळ्यासाठी (Maghi Yatra Ceremony) पंढरपूरात  दाखल झालेल्या भाविकांना उपवासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भगर आणि आमटी खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली असून १३७ भाविकांना गुरूवारी पहाटे पंढरपूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pandharpur News)

मागील गेल्या २५ वर्षांपासून मनाठा ते पंढरपूर ही पायी दिंडी येते. या दिंडीतून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील जवळपास १८५ लोक पायी चालत पंढरपूरला येतात. या वर्षी माघी यात्रोत्सव साजरा करण्यासाठी ३१ जानेवारी रोजी हे भाविक पंढरपूरात (Pandharpur News) दाखल झाले. पंढरपूर येथील संत निळोबा महाराज मठात त्यांनी मुक्काम केला. एकादशीच्या उपवासादिवशी (Fasting Day Of Ekadashi) या भाविकांनी भगर आणि आमटी खाल्ली त्यानंतर त्यांना गुरूवारी पहाटेच्या सुमारास मळमळ (Nausea,), उलट्या (Vomiting) व चक्कर येणे (Dizziness) हा त्रास सुरू झाला. सदर माहिती मिळताच शासनाची १०८ रूग्णवाहिका तेथे दाखल झाली.

आणि अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झालेल्या जवळपास १३७ जणांना गुरूवारी पहाटे पंढरपूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पंढरपूर शहरातील मर्दा या दुकानातून जेवण बनविण्याचे साहित्य आणले असल्याची माहिती मिळते. तर विषबाधा झालेल्या अन्नाचे नमुने देखील अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.

याबाबत बोलताना पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
(Medical Superintendent of Pandharpur Upazila Hospital)
महेशकुमार माने म्हणाले, ‘ पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात एकूण १३७ भाविक उपचार घेत आहेत.
आणि सर्व भाविकांची प्रकृती स्थिर आहे.’
अशी माहिती पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक महेशकुमार माने (Mahesh Kumar Mane) यांनी दिली.

 

Web Title :- Pandharpur News | pandharpur 137 devotees admitted to hospitaldue to poisoning after eating fasting food during maghi wari

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai ACB Trap | 15 लाख रुपये लाच घेताना वस्त्रउद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Ajit Pawar On Pune Police | पुणे पोलिसांच्या ‘त्या’ निर्णयावर अजित पवारांची टीका; म्हणाले – ‘
…तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात, पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नयेत’ (VIDEO)

Chinchwad Bypoll Elections | अजित पवारांनी मुलाखत घेण्याआधीच राष्ट्रवादीच्या नेत्याने विकत घेतले नामिर्देश पत्र, राजकीय चर्चांना उधाण