विठ्ठल मंदिरात अवतरला ‘तिरंगा’, प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक ‘सजावट’

पंढरपुर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात राष्ट्रीय ध्वज तिरंगाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण मंदिर परीसर फुलांनी फुलून गेले आहे.

राष्ट्रीय तसेच धार्मिक सणाचे औचित्य साधून मंदिर परिसरात पुण्यातील धायरी येथील कलाकार तसेच मोरया ग्रुपच्या वतीने ही आकर्षक फुलांची सजावट गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. त्यात दसरा, दिवाळी, १ मे, १५ ऑगस्ट अशा विविध विशेष दिनी त्या त्या दिवसाला साजेसी फुलांची सजावट केली जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरातील विठ्ठल मुर्ती तसेच रुक्मिणी मंदिरात झेंडू, शेवंती आणि तुळशीच्या पानांचा वापर करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –