Pandharpur Wari 2021 : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या शिवशाही बसने पंढरपूरकडे मार्गस्थ

पुणे (Pune): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pandharpur Wari 2021 : तीर्थक्षेत्र आंळदीतून माऊलींच्या चांदीच्या पादुका आणि देहुतून जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या शिवशाही बसमधून पंढरपूरकडे आज सकाळी मार्गस्थ झाल्या. राज्यभरातून १० संतांच्या पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ होत असून त्या सर्व पालख्या वाखरीत एकत्र येणार आहेत. त्यानंतर तेथून पायीवारी करुन त्या पंढरपूरला पोहचणार आहेत.

आळंदी येथे सोमवारी पहाटे घंटानाद झाल्यानंतर आजोळघरातील माऊलींच्या चलपादुका सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या गेल्या. त्यांच्यासोबत ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक व अन्य मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा करण्यात आली. त्यानंतर पादुका पालखीत ठेवून ती पालखी विशेष शिवशाही बसमध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकी २ विशेष बसमधून पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आली.

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुका देऊळवाड्यातून भजनी मंडपात आणण्यात आल्या. किर्तन झाल्यानंतर या पादुका ४० वारकर्‍यांसह २ शिवशाही बसमधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. मुक्ताई पालखीचे प्रस्थान झाले असून मुक्ताईच्या पादुका शिवशाही बसने पंढरपूरकडे रवाना झाल्या. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरहून आई रुक्मिणीची मानाची पालखी शिवशाही बसमधून पंढरपूरला रवाना झाली. महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी बसला हिरवा झेंडा दाखविला. ८७५ किमींचा प्रवास करुन ही पालखी सोमवारी सायंकाळी पंढरपूरला पोहचणार आहे.

नाशिक येथून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून आज सकाळी प्रस्थान झाले.
आज पहाटे निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालण्यात आले.
त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
त्यानंतर भर पावसात विठ्ठलाच्या आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयघोषात भजन किर्तन करुन समाधी मंदिरात पादुका नेण्यात आल्या.
त्यानंतर पालखी बसमधून रवाना झाल्या.राज्यभरातून २० संतांच्या पालख्या पंढरपूरला शिवशाही बसमधून येत आहे.त्या सोमवारी सायंकाळीपर्यंत वाखारी येथे पोहचतील, अशा पद्धतीने या सर्व पालख्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title : Pandharpur Wari 2021 : Sant Dnyaneshwar, Sant Tukaram Maharaj’s palanquin Shivshahi bus en route to Pandharpur

 

Accident in Toranmal | नंदुरबार जिल्ह्यात भीषण अपघात, क्रूझर दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Red Light | ‘सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा’ ! राजेश्वरी खरातचा नवा अंदाज,
‘रेड लाईट’चं पोस्टर रिलीझ (व्हिडीओ)

Monsoon Healthy Diet | मान्सूनमध्ये तळलेल्या-भाजलेल्या पदार्थांनी होईल नुकसान,
आजारांपासून बचावासाठी ‘या’ 7 गोष्टींचे करा सेवन; जाणून घ्या