Advt.

Pandit Birju Maharaj Passes Away | प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pandit Birju Maharaj Passes Away | लखनऊ घराण्याशी संबंध असलेले प्रसिद्ध कथ्थक नृत्यकार पंडीत बिरजू महाराज (वय ८३) यांचे निधन झाले.  त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांचे खरे नाव बृज मोहन मिश्रा होते. (Pandit Birju Maharaj Passes Away)

 

लखनऊमध्ये ४ फेब्रुवारी १९३८ मध्ये त्यांचा जन्म झाला. पंडीत बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर, गायक आणि संगीतकार होते. त्याचबरोबर ते वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे तसेच ते चित्र सुद्धा रेखाटत होते. त्यांचे जगभरात अनेक शिष्य सुप्रसिद्ध कलाकार आहे.

 

पंडीत बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये  पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड च्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी  नृत्यदिग्दर्शनही केले. ज्यामध्ये उमराव जान, देढ इश्किया, बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे. विश्वरूपम चित्रपटातील नृत्यदिग्दर्शनासाठी २०१२मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील पंडीत बिरजू महाराज यांना मिळाला आहे.

Web Title : Pandit Birju Maharaj Passes Away | legendary kathak dancer pandit birju maharaj passes away at 83

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी