पंडित दीनदयाळ व्याख्यानमाला : केंद्रीय राज्यमंत्री सारंगी यांच्या हस्‍ते उद्घाटन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुढील महिन्यात ३ ते ५ सप्टेंबर तीन दिवस पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे आयोजन माऊली संकुल सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा यांनी दिली.

व्याख्यानमालेचे संयोजन समिती प्रमुख धनंजय तागडे यांनी सांगितले की, व्याख्यानमालेचा शुभारंभ मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता केंद्रीय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या हस्ते होईल. खासदार डॉक्टर सुजय विखे यावेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर रा. स्व. संघाचे इंद्रेशकुमार यांचे ‘काश्मिर काल-आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता लेखक, ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे ‘पुरोगामी झाले प्रतिगामी’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांचे ‘एकात्मता मानवता वादातून आधुनिक भारताकडे वाटचाल’ या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते महिला सबलीकरण-बचतगट योजना व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या मोबाईल बँकिंगचे उद्घाटन होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like