Pandit Jasraj Songs : पंडित जसराज यांनी फक्त 4 चित्रपटांसाठी दिला होता ‘आवाज’, जाणून घ्या ‘ते’ सिनेमे कोणते ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय संगीत जगताचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे निधन झाले. संगीत साधक पंडित जसराज यांची संगीत जगतात जवळजवळ 80 वर्षाची कारकीर्द आहे. त्यांना देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. संगीताच्या प्रसिद्ध मेवाती घराण्यातील पंडित जसराज यांनी मोठ्या प्रमाणात शास्त्रीय गायन केले आणि आपल्या आवाजाने केवळ 4 चित्रपट सुशोभित केले.

1966 मध्ये पंडितजींनी व्ही शांताराम यांचा द्वैभाषिक चित्रपट ‘लडकी सह्याद्री की’ साठी गाणे गायले होते. हा चित्रपट मराठी भाषेतही तयार झाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका त्यावेळची गाजलेली अभिनेत्री संध्याने केली होती. पंडित जसराज यांनी या चित्रपटात वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली राग अहिर भैरव मध्ये एका भजनाला आवाज दिला होता.

त्यानंतर त्यांनी 1975 मध्ये ‘बीरबल माय ब्रदर’ या चित्रपटाच्या एका गाण्यात भारतीय संगीत जगतातील अजून एक मोठे स्टार पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबर जुगलबंदी केली होती. ही जुगलबंदी संगीत रसिकांसाठी एखाद्या भेटीपेक्षा काही कमी नव्हती, परंतु चित्रपट लोकप्रिय न झाल्यामुळे ही जुगलबंदी विस्मृतीत गेली. तसेच 2008 मध्ये त्यांनी अदनान सामीच्या संगीत दिग्दर्शनाखाली विक्रम भट्ट यांच्या 1920 या चित्रपटात एका गाण्याला आवाज दिला होता. 2012 मध्ये त्यांनी इरफान खानच्या ‘लाइफ ऑफ पाई’ साठी एक गाणे गायले होते. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन मायकल डाना यांनी केले होते.

संगीत जगतात शोक

लता मंगेशकर यांनी लिहिले – महान शास्त्रीय गायक आणि माता सरस्वतीचे उपासक संगीत मार्तंड पंडित जसराजजी यांच्या स्वर्गवासाची बातमी ऐकून मला फार दुःख झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी मी प्रार्थना करते.

 

 

 

 

विशाल ददलानी यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले – नुकतेच दिग्गज पंडित जसराजजी यांच्या मृत्यूबद्दल ऐकले. संगीत आणि या ग्रहावरील प्रत्येक संगीतकाराबद्दल माझे शोक. खरोखर खूप मोठे नुकसान.

 

 

 

 

अदनान सामी यांनी पंडितजींसोबत आपली छायाचित्रे शेअर केली आणि लिहिले- त्यांच्याबरोबर घालवलेले क्षण हे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण आहेत. मी त्यांच्या संगीतापासून खूप काही शिकलो आहे. त्यांनी मला खूप प्रेरित केले. माझ्या आयुष्यातली मुख्य गोष्ट म्हणजे माझ्या संगीत दिग्दर्शनातले त्यांचे गाणे आहे. त्यांनी आपल्यासाठी संगीताची तिजोरी ठेवली आहे, जी अमर आहे. त्यांची आठवण येईल.

 

 

 

 

 

ए.आर. रहमान, सोना महापात्रा, मनोज वाजपेयी, निमृत कौर यांनीही पंडित जसराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सोनाने लिहिले- मी सुमारे दोन दशकांपूर्वी सेंट झेवियर्स झेन फेस्ट येथे मैफिलीत प्रथम पंडित जसराज यांना ऐकले होते. असे वाटले होते की स्वर्ग खाली उतरला आहे. ती सकाळ कधीच विसरणार नाही.