जास्त काम मिळाल्यानं नीना गुप्ता खुपच खुश, म्हणाल्या – ‘माझी वेळ आलीय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या आजकाल खूप व्यस्त आहे. त्यांच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. नुकतेच ते ‘पंगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पोहोचल्या. तेथे नीना म्हणाल्या की, ‘उशार झाला पण असो आता माझी वेळ आली आहे.’

नीना यांनी ‘पंगा’च्या प्रमोशनमध्ये एक कविता वाचून दाखवली. त्या म्हणाल्या की, ‘माझी वेळ आली आहे, मग मी विचार केला की माझी वेळ मला सोडून कधी गेलीच नव्हती. मी खूप दिवसांच्या सुट्टीवर होते. कामाकडे कधी लक्ष दिले नाही.’ पुढे नीना म्हणाल्या की, ‘मला आता खूप काम मिळत आहे याचा मला आनंद आहे.’

नीना गुप्ता ‘पंगा’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्या कंगना रनौतच्या आईची भूमिका साकारणार आहे. अश्विनी अय्यर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कित्येक वर्षांनंतर नीना गुप्ता म्हणाल्या की, ‘लग्न न करता आई असल्याची खंत आहे.’

याशिवाय नीना गुप्ता या आयुष्मान खुरानाच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात त्या गिरीराज राव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अक्षयच्या सूर्यवंशीमध्येही त्या दिसणार आहे. यावर्षी मार्चमध्ये ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होणार आहे.

‘बधाई हो’ या चित्रपटात त्यांच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली होती. या चित्रपटात त्या आयुष्मान खुरानाच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नीना गुप्ता या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्या इन्स्टाग्रामवर नेहमी काहीतरी पोस्ट करत असतात. नीना गुप्ता यांची ड्रेसिंग सेन्सही नेहमी चर्चेत असते.

 

फेसबुक पेज लाईक करा –