भूजबळांच्या समता मेळाव्यात जोरदार गोंधळ, राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळली

बीड : पोलीसनामा आॅनलाईन
राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्या समता मेळाव्यात जोरदार गोंधळ झाला असून राष्ट्रवादीतील गटबाजी उफाळून आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी केली आहे.
समता मेळाव्यात बीडच्या स्थानिक राजकारणातील गटबाजी दिसून आली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांना हे शक्तीप्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न क्षीरसागर यांच्याकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92acc565-c3f5-11e8-938b-ed4bad033f66′]
भुजबळ यांचे आगमन होताच जयदत्त क्षीरसागर समर्थक स्टेजजवळ आले आणि प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. बीड का नेता कैसा हो जयदत्त क्षीरसागर जैसा हो अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याशी बोलून त्यांना स्टेजसमोरील मोकळ्या जागेत बसवले. त्यामुळे या मेळाव्यात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर भुजबळांसह सर्वच नेत्यांनी शांततेचं आवाहन केल्यामुळे अखेर मेळाव्याला शांततेत सुरूवात झाली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92acc565-c3f5-11e8-938b-ed4bad033f66′]
दरम्यान बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष सध्या पेटला आहे.
जाहिरात