दुर्देवी ! जावायानं मुलीला दिला नाही मोबाईल, आजीनं नातीला ‘आपटून-आपटून’ मारून टाकलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पानिपतमध्ये एक हृदय पिळवटून टाकेल अशी घटना घडली. एका आजीने आपल्या 6 महिन्याच्या नातीला जमिनीवर अपटले. या घटनेत या चिमुकलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आता आरोपी महिलेचा तपास सुरु केला आहे.

ही घटना पती पत्नीत होणाऱ्या वादावरुन झाली. राणा माजरा गावातील महिला आपल्या मुलीच्या सासरी आली होती. मुलीला नवा फोन खरेदी करुन द्या, यावरुन तिचा जावयासोबत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की आई आपल्या मुलीला घेऊन माहेरी जाण्यास निघाली. जावायाने पत्नीला आणि त्यांच्या मुलीला माहेरी घेऊन जाण्यास नकार दिला.

जमिनीवर आदळले डोके –
रागाच्या भरात सासूने सहा महिन्याच्या नातीला जमिनीवर फेकले. जमिनीवर डोके जोरात आदळल्याने मुलीच्या डोक्याचे हाड तुटले. नातीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होताना पाहून सासू फरार झाली. पोलिसांनी या आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे आणि पुढील तपास सुरु केला आहे.

सहारनपूर उत्तर प्रदेशच्या बाबूपुरा गावातील रहिवासी रुकसाना यांनी सांगितले की बुधवारी ती राणामाजरा गावातील तिच्या भाच्याच्या घरी आली होती. बिलालची सासू संजिदा मेरठहून आपली मुलगी रजिया आणि नात सुनैया यांना घेऊन गुरुवारी राणामाजरा गावात एका उत्साहासाठी आपल्या मुलीच्या आसमीनच्या घरी आली होती.

सासू संजिदा हिने जावयावर मुलगी आसमीनला फोन घेऊन देण्यासाठी जबाव आणला. फोन देण्यास नकार दिल्याने संजिदा आपल्या मुलीला आसमीनला घेऊन घरी निघाली होती. परंतु जावयाने सासूला आपल्या पत्नीला आणि मुलीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला.

त्या रागाच्या भरात सासुने आसमीनच्या कडेवर असलेल्या सहा महिन्याची नात अक्षाला उचून जमिनीवर अपटले. मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु मुलीची तब्येत नाजूक असल्याने मुलीला सामान्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु मुलीने रस्त्यातच जीव सोडला.

नातेवाईकांनी सांगितले की दांपत्यात हुंड्यावरील देखील केस सुरु आहे. मुलांवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीला सुनैयाला आजोबांच्या घरी सोडले होते. गुरुवारी सुनैया आपल्या आजीसह आई आसमीन, वडील बिलाल यांना भेटण्यासाठी आली होती.

या वादादरम्यान बिलालने स्वत:ला खोलीत बंद केले आणि तो कंरट लावू आत्महत्या करण्याचे बोलत होता. त्यादरम्यान पत्नीने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केल्याने आजूबाजूच्या जमा झालेल्या लोकांनी विजेची तार तोडली होती, ज्यामुळे वीज बंद झाली होती.

नातेवाईकांनी आरोप लावला की पोलीस महिलेला त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. त्यानंतर सर्व कुटूंब देखील कुठेतरी निघून गेले. तर पोलिसांनी सांगितले की महिलेचा तपास सुरु आहे. आरोपी संजिदाच्या विरोधात केस दाखल करुन तपास सुरु झाला आहे. सध्या तपासासाठी छापेमारी सुरु आहे, लवकरत आरोपीला ताब्यात घेण्यात येईल.