धक्कादायक ! कबड्डीपट्टू सुरेंद्रचा मृतदेह सापडला त्याच्या शेतात, पोलिसांचा तपास सुरू

हरियाणा : वृत्तसंस्था – हरियाणा जिल्ह्यातील एक कबड्डीपटू सुरेन्द्रचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह शेतात सापडला आहे. सुरेंद्र पानीपतमधील कुरणा गावात राहणारा होता. सुरेंद्र हा हरियाणाचा स्टार खेळाडू होता, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्याने बर्‍याच राज्यात वास्तव्य केले आणि बरीच बक्षिसे जिंकली. सुमारे महिनाभरापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचा मृतदेहही शेतातच आढळला होता. दीड वर्षापूर्वी आईचे निधन झाले. सुरेंद्रच्या निधनानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सुरेंद्रचं कोणाशीही वैर नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. एक खेळाडू असल्याने त्याचा सर्वांशी चांगला संबंध होता. कुटुंबातील सदस्यांनुसार शुक्रवारी संध्याकाळी सुरेंद्र जेव्हा घरी पोहोचला नाही तेव्हा सर्वांनी त्यांच्या पातळीवर शोध सुरू केला. यानंतर त्याचा मृतदेह शेताजवळ सापडला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि घटना स्थळाची पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हील रुग्णालयात पाठविला आहे. सध्या मृत्यू बाबतची कोणतीही कारणे समोर आली नाहीत. नातेवाईकांचे जबाब घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सुरेंद्र शुक्रवारी संध्याकाळी शेतात जाण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि त्यानंतर बराच वेळ लोटला तरी तो घरी परतला नाही, असे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत सुरेंद्र घरी पोहोचला नव्हता तेव्हा कुटुंबीयांनी बराच शोध घेतला पण त्यांना काही सापडले नाही. शोध घेताना नातेवाईक शेतात आले असता सुरेंद्रचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत शेताच्या ट्यूबल होडीत सापडला. यानंतर लगेचच कुटुंबीयांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रच्या शरीरावर जखमांचे कोणतेही खूण नाही. या क्षणी मृत्यूची कोणतीही कारणे समोर आलेले नाहीत. येथे सुरेंद्रच्या भावाचाही महिनाभरापूर्वी मृत्यू झाला होता. दुसर्‍या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like