‘पानीपत’ पोस्टर : संजय दत्तचा ‘भयानक’ लुक, पार्वती बाईच्या अवतारामध्ये कृति सेनन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्जुन कपूर, संजय दत्त, कृति सेनन यांच्या प्रदर्शित होणाऱ्या पानिपत या सिनेमाचा ट्रेलर 5 नोव्हेंबरला रिजिल होणार आहे. याआधी या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत, ज्यातून संजय दत्त आणि कृति सेननचा लूक आऊट करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत एकदम फीट बसत आहे तर हा लूक देखील अत्यंत भयानक दिसत आहे. या पेहरावात संजय दत्त एका योद्धाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच कृति पारंपारिक पेहरावात अत्यंत उत्तम लूकमध्ये दिसत आहे.

या सिनेमातील संजय दत्त याच पेहराव हैवी असल्याचे दिसत आहे. या सिनेमात भूमिका साकारण्यासाठी संजयने एक डायट प्लान देखील केला होता, जीममध्ये जाऊन त्याने त्याची पिळदार बॉडी तयार केली आहे.
https://www.instagram.com/p/B4bh7jdAYYq/?utm_source=ig_web_copy_link

कसा आहे कृति सेननचा लूक –
या सिनेमातील पोस्टमध्ये कृति पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. पोस्टरवरुन ती सिनेमात पार्वती बाईंची भूमिका साकारत आहे असे दिसते आहे. यात ती घौडस्वारी देखील करेल, आता हे पाहणे औस्तूक्याचे ठरेल की पडद्यावर हा सर्व थरार कसा दिसेल.
https://www.instagram.com/p/B4bvqF2g9UH/?utm_source=ig_web_copy_link

केव्हा रिलीज होईल सिनेमा –
पानिपतमध्ये संजय दत्त अफगाणिस्तानचा क्रुर राजा अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारत आहे. दिगदर्शक आशुतोष गोवारीकरचा हा सिनेमा 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर हा सिनेमा आधारित असेल. जी अब्दाली आणि मराठ्यामध्ये 1761 साली झाली होती. संजय दत्त शिवाय अर्जून कपूर लीड रोलमध्ये आहे. आता प्रतिक्षा आहे ती अर्जुन कपूरच्या लूकची. कारण त्याच्या भूमिकेचा पोस्टर अजूनही रिलीज झालेला नाही.

Visit : Policenama.com