१४ जानेवारीला पानिपत शौर्यदिन होणार साजरा, महाराष्ट्रातून हजारो मराठे जाणार पानिपतला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – १४ जानेवारी रोजी काला आम, पानिपत, हरियाना या ठिकाणी २५९ वा ‘पानिपत शौर्यदिन’ विविध उपक्रमाने साजरा केला जाणार आहे. या कार्य क्रमास महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून हजारोंच्या संख्येने तमाम मराठा बांधव विविध संघटना यात सहभागी होणार आहेत, तसेच पानिपत रणसंग्रामात सहभागी व प्रसंगी कामी आलेल्या सरदारांचे वंशजांची उपस्थित असणार आहेत. पानिपतात १४ जानेवारी १७६१ रोजी अफगाण लुटेरा अहमद शाह अब्दाली व मराठ्यांमध्ये झालेल्या युद्धास २५९ वर्षे पूर्ण होत आहेत. पानिपत युद्धात शिंदे घराण्यांनी थोर पराक्रम गाजवला प्रसंगी बलिदान दिले त्यानंतरच लगेचंच पानिपत बदला रणधुरंधर महादजी शिंदे यांनी घेतला व दिल्लीवर मराठाशाहीचा भगवा फडकवला.

पानिपत हरियाणा येथे दरवर्षी महाराष्ट्रातून मराठा बांधव जात असतात या शौर्य स्मारकास जीवनामध्ये एकदा तरी भेट द्यावी व अशाच पद्धतीने महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावांत १४ जानेवारीस पानिपत शौर्य दिन साजरा व्हावा. पानिपत युद्ध हे राष्ट्र प्रेमाचं प्रतिक आहे, कारण हाजारों किलोमिटरचा दूर जावून शत्रूवर प्रहार करणे सोपी गोष्ट नाही हे फक्त लढवय्या मराठाच करु शकतो. म्हणून मराठ्यांचा दैदीप्यमान इतिहास हा नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य हेतू आहे. असे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महादजी शिंदे यांच्या परिवारातील उत्तमराव शिंदे सरकार यांनी म्हंटले.

या वर्षी पुण्यातून व महाराष्ट्रातून हजारो बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर उत्तमराव शिंदे सरकार पुढे म्हणाले कि पुढ्याल्या वर्षी असा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही पुण्यात साजरा करणार असून शिंदे छत्री वानवडी, पुणे या ठिकाणी तो पार पडणार आहे. या ठिकाणी महादजी शिंदे यांचे भव्य स्मारक, त्यांच्या आयुष्यावर चित्रफित आम्ही करणार असून महाराष्ट्र सरकार व पुणे महानगरपालिका यांना आम्ही निवेदन देणार असून ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या पत्रकार परिषदेला राणी मस्तानी यांचे आठवे वंशज नवाब शहाबद बहाद्दूर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, प्रकाश सावंत, शिरीष घोरपडे, नवनाथ आव्हाळे, उत्तमराव शिंदे सरकार, चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/