पंकज भुजबळ पिछाडीवर, दीपक केसरकर आघाडीवर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नांदगाव मतदारसंघातील माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे पहिल्या फेरीत पिछाडीवर पडले आहेत. शिवसेनेचे सुहास कांदे यांनी २ हजार २०० मतांची आघाडी घेतली आहे.

दुसरीकडे सांगलीतील जत मतदार संघात काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी पोस्टल मतदानामध्ये १ हजार ३३३ मतांची आघाडी घेतली असून भाजपाचे विलासराव जगताप पिछाडीवर पडले आहे.

गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना नारायण राणे यांनी पाठबळ दिले होते. तरीही सावंतवाडीतून दीपक केसकर हे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आले आहेत.

टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत

Visit : Policenama.com