पंकज देशमुख नवे वाहतुक पोलीस उपायुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्याहून बदली होऊन पुणे शहर पोलीस दलात आलेले पंकज देशमुख यांची नियुक्ती वाहतुक शाखेच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

साताऱ्याचे पोलीस अधिक्षक असलेले पंकज देशमुख यांची पुण्यात बदली करण्यात आली. तर पुणे शहर पोलीस दलातील वाहतुक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा पोलीस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे. पंकज देशमुख यांची पुणे शहर आयुक्तालयात सातपुते यांच्या जागी वाहतुक पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते गुरुवारी पोलीस आयुक्तालयात हजर झाले आहेत.