मंत्री DM आणि माजी मंत्री PM निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ‘आमने-सामने’, पुढं झालं ‘असं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – संत वामनभाऊ यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे खूप दिवसांनी आमनेसामने आल्याचे दिसून आले. परळी विधानसभा मतदारसंघातील परभवानंतर मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदाच आमने-सामने आल्याचे दिसले. संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर दिसून आले. गेली 5 वर्षे पंकजा मंत्री म्हणून गडावर येत होत्या. यावेळी धनंजय मुंडे मंत्री म्हणून गडावर आले होते.

काही वर्षांपूर्वी भगवान गडाच्या मेळाव्यावरून मोठा वाद झाला होता. विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रचारातही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. दोघांमध्ये कटुता आली होती. आता हे नेते एकत्र आल्यानं सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर आले तेव्हा सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलं होतं ते म्हणजे दोघांची एकमेकांशी बातचित होते की, नाही. व्यासपीठावर एकत्र असले तरी दोघेही नेते अंतर राखून होते. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे वेगवेगळ्या वेळेला गडावर आले आणि दोघांनीही पूजा केली. दोघांमध्ये फक्त नजरा-नजर झाली. ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/