पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंना पक्षातर्गंत कारवाया करून पाडलं, एकनाथ खडसेंनी सांगितलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपला सत्ता स्थापने पासून दूर रहावे लागेल. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या पराभाचे खापर पक्षातील नेत्यांवर फोडले. मला सोबत घेतले असते तर भाजपच्या जागा वाढल्या असत्या असे खडसेंनी म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंकजा मुंडे आणि अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा पराभव झाला नाही, तर पक्षांतर्गत कारवाया करुन त्यांना पाडण्यात आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ज्यांनी पक्षाअंतर्गत हे कारस्थान केले आहे, त्यांची नावे आम्ही पक्षाकडे दिलेली आहेत, मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही असेही खडसे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक जण अस्वस्थ आहेत. 12 डिसेंबरला काय निर्णय होणार ? याची प्रतिक्षा करा. आपणही गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे खळबजनक विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे.

पंकजा मुंडे यांच्या अस्वस्थेबाबत बोलताना खडसे म्हणला, पंकजा मुंडे निवडणूकीत पराभूत झालेल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आले. त्याचप्रमाणे मुक्ताईनगरमध्ये घडले. अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना पाडण्यात आले. पक्षातर्गंत कारवाया करून हेतुपुरस्सरपणे त्यांना पाडण्यात आले आहे. ज्यांनी काम केले नाही त्यांचे पुरावेपण पक्षाला दिले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांकडून अद्याप लक्ष दिलेले नाही. त्याचमुळे पक्षात अस्वस्थाता आहे, असे खडसे म्हणाले.

राज्यातील अनेक अस्वस्थ नेते आपल्याशी संपर्क साधत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या नेत्यांशी कोणही चर्चा केली नाही. त्यांच्या पराभूत होण्याची कारणेही जाणून घेतली नाहीत. त्यामुळे आपल्याला कोणी विचारत नसल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. पक्षाला सल्ला देताना खडसे म्हणाले, अजूनही वेळ गेलेली नाही. पराभूत नेत्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करावी असा सल्ला त्यांनी दिला.

Visit : policenama.com