Pankaja Munde | ‘बीडमधील लढत धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे होती का?’ पंकजा यांनी सांगितलं…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde | बीडमधील नगरपंचायतीमध्ये भाजपनं (BJP) आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेचा (Pankaja Munde) राष्ट्रवादीला (NCP) एक धक्का मानला जातो आहे. या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान निकालानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी बीडमधील (Beed News) आयोजित पत्रकार परिषदेत संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, ”सत्ता असूनही सत्ताधारी यश मिळवण्यात कमी पडले आहेत. लोकांनी भाजपलाच (BJP) पहिली पसंती दिली. राज्यातील निकाल पाहिले. त्यातही लोकांनी भाजपलाही साथ दिली. बीडमध्येही ज्या नगरपंचायती होत्या त्यात भाजपला बहुमत मिळालंय असं चित्र स्पष्ट झालंय. बीड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचेही मी आभार मानते,” असं त्या म्हणाल्या.

https://twitter.com/Pankajamunde/status/1483692748280500227?

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) अशी लढत होती का ? असा प्रश्न केला असता त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, “बीडमधील लढत ही तुम्ही समजता तशी नव्हती. एका मतदारसंघाचं नेतृत्व आणि जिल्ह्याचं पालकत्व यात खुप फरक आहे. बीड जिल्ह्याचं जे चित्र आहे ते गेल्या अडीच वर्षांतील कामकाजाचा राग, रोष आणि आमच्या काळातील कामावरचा विश्वास आहे. आता बीड जिल्ह्यातील लोकांनी भविष्यात काय असेल याचेच संकेत दिले आहेत,” असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान, निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्वीटही केलं आहे. “बीडमध्ये मिळालेला विजय आणि राज्यात ठिकठिकाणी मिळालेला विजय हा संपूर्णपणे कार्यकर्त्यांचा आहे.
लढाई कड़ी है पर तैयारी और उम्मीद बड़ी है,” असं त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
तसेच, ”बीडमध्ये एकसंध असा भाजप सोडला तर कोणताही पक्ष नाही.
प्रत्येक जण एकेका मतदारसंघाचा ठेका घेत असून जिल्ह्याच्या भविष्यासाठी कोणीही काम करत नाही. पालकमंत्रीही नाही.
भाजप हाच एक पक्ष आहे जो एकसंध राहून जिल्ह्याच्या भविष्यासाठी काम करत असल्याचं देखील पंकजा यांनी म्हटलं आहे.

Web Title : Pankaja Munde | beed nagar panchayat election updates pankaja munde speaks about dhananjay munde beed results

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा