Pankaja Munde | रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात आज तीन मोठे दसरा मेळावे (Dasara Melava) होत आहेत. शिंदे गटाचा (Shinde Group) आणि ठाकरे गटाचा (Thackeray Group) मुंबईत दसरा मेळावा होत आहे. तर पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांचा बीड जिल्ह्यातील भगवान गडावर (Bhagwangad) दसरा मेळावा झाला. दसरा मेळाव्याला संबोधीत करताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की, ओ पोलीस तुमच्याशी बोलते, संपूर्ण सभा शांत आणि शिस्तीत आहे. समोर असलेले काही धिंगाणा करत आहे. तुम्ही आमचे असाल तर धिगांणा करणार नाही.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत पंकजा यांनी व्यक्त केले. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीराजेंचा (Chhatrapati Sambhaji Raje) आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी आगामी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

‘हा’ चिखल तुडवमाऱ्यांचा मेळावा

पंकजा मुंडे यांनी बोलताना गोपीनाथ मुंडेंना (Gopinath Mundane) कधी संघर्ष चुकला नाही, मलाही चुकणार नाही, असे म्हटले. ठाकरे आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका करताना त्या म्हणाल्या, मेळावा म्हटलं की, टीका होते, चिखलफेक होते. पण आमच्या मेळाव्यात काय होईल, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा हा मेळावा चिखलफेक करणाऱ्यांचा नाही, चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा असल्याचे मुंडे म्हणाल्या.

 

तर त्याला क्षमा करणार नाही

माझे लोक म्हणजे समुद्र आहे. समुद्राला बांधणे शक्य नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. लोकांना प्रेम नाही दलं तर खुर्चा रिकाम्या राहतील. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) 2019 मध्ये महाजनादेश यात्रा काढली होती, त्यावेळी सभा घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरले. आता हे लोक माझी ताकद वाढवण्यासाठी आले आहेत. ज्या मुशीतून आमचे नेते आले त्याच मुशीतून मी आले आहे. आमच्यात व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन हेच श्रेष्ठ असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मी कोणावरही नाराज नाही

आता आमदारांची यादी (MLA) आली तर माझ नाव घेऊ नका, असे त्यांनी यावेळी सांगितले. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ, असे ही त्या म्हणाल्या. मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष आला आहे. योग्य वेळेची वाट बघा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य अस्वस्थ होत पण पारजित होत नाही असेही त्यांनी म्हटले.

कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला स्पर्श केला नाही

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आता मी 2024 ला पक्षाने तिकीट दिल तर तयारीला लागणार आहे.
मला कोणत्याही नात्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला कधीही स्पर्श केला नाही,
हे सांगताना त्या भावनिक झाल्याचे पहायला मिळाले. मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही.
मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही.
मी तुमच्यासोबत काम करत राहणार आहे.
आपण आपलं काम करणार आहोत आता पदाची अपेक्षा करु नका असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title :- Pankaja Munde | beed pankaja munde dasara melava bhagwangad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | औरंगाबाद पोलिसांचा फार्म हाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

Andheri East Bypoll Election | अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ शिवसेनेच्या पाठीशी, शिंदे गटाला दिले ओपन चँलेंज