Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी गर्दी करणार्‍यांवर आयोजकांसह 43 नेते आणि 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नुकत्याच झालेल्या मोदी मंत्रिमंडळ विस्तारात (modi cabinet expansion) खासदार प्रीतम मुंडे (mp pritam munde) यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराज झाले. यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी मुंबईत येऊन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या वरळीतील कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. त्यांची समजूत काढण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बैठकही घेतली. दरम्यान, कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेकायदेशीरपणे गर्दी केल्याने 43 राजकीय नेत्यांसह 100 ते 120 कार्यकर्त्यांविरुद्ध वरळी पोलीस ठाण्यात (Worli Police Station) मंगळवारी रात्री गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

पंकजा मुंडे यांचे हे समर्थक बीड, बुलडाणा, जळगाव, शिरुर, अहमदनगर अशा विविध भागातून आले होते. त्यांनी पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील निवासस्थान असलेल्या सुखदा इमारतीमधील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी भाषण करत समर्थकांची समजूत काढली.

या प्रकरणी कोरोना काळातील नियमांचे आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत गर्दी केल्याने वरळी पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक प्रदीप सोनावणे (Pradeep Sonawane) यांच्या फिर्यादीवरुन वरळी पोलिसांनी कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये आयोजकांसह 43 राजकीय नेते मंडळीसह 100 ते 120 कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी यापैकी 17 जणांना ताब्यात घेऊन नंतर नोटीस देत सोडून दिले.

Web Titel :- Pankaja Munde | big action taken against those who crowded outside office support pankaja munde

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ