Pankaja Munde | राणे समर्थकाचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करत आहेत’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषद निवडणुकीवरून (Vidhan Parishad Election) भाजपांतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. विधान परिषदेची उमेदवारी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना न मिळाल्याने त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले असून ते भाजपा (BJP) नेत्यांनाच टार्गेट करत आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपामधील राणे समर्थक (Rane Supporters) आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे (Congress) सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पाटील (Santosh Patil) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर थेट आरोप केला आहे.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) तुळजापुरात आले असताना त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर राणे समर्थक संतोष पाटील यांनी पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल (Blackmail) करत आहेत, असा आरोप केला आहे.

 

संतोष पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भाजपामधील वाद पुन्हा एकदा वर आला आहे. पाटील यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही.

संतोष पाटील पुढे म्हणाले की, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)
यांच्या वारसदार असल्याचे सांगून पंकजा मुंडे पक्षाला नेहमीच ब्लॅकमेल करतात.
वारसदार जन्माने नव्हे, तर कर्तृत्वाने ठरत असतो, याचा विचार पंकजा मुंडे यांनी केलेला दिसत नाही.
शरद पवार (Sharad Pawar), नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यानंतर दिल्लीत शब्दाचे वजन असलेला देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा नेता नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) हे फडणवीस यांची नेहमीच पाठराखण करतात.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde blackmailing to bjp allegations by rane supporters santosh patil solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone | हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात दाखल

 

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

 

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’