Pankaja Munde | पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली खदखद, म्हणाल्या – ‘फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल, पण…’

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने नुकतीच विधान परिषदेच्या (Legislative Council) उमेदवारांची नावे जाहिर केली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभावमुळे मागील अनेकवेळा डावलण्यात आलेल्या भाजप नेत्या (BJP leader) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना यावेळी संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, यावेळेसही त्यांच्या पदरी निशाच पडली आहे. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांची विधान परिषदेवर वर्णी लावली आहे. या निर्णयानंतर पकंजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपल्या मनातली खदखद एका कार्यक्रमात बोलून दाखवली.

 

फाटक्या माणसापुढे नतमस्तक होईल, पण…
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे (Totaram Kayande) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. माझे माता-पिता माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल. पण, पदासाठी कुणासमोर हात फैलावून मागणी करणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

आमच्या रक्तात तशी सवय नाही
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, राजकारणात संधी नाही मिळाली तर नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडायची नाही, ही शपथ गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेबांना अग्नि देताना घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. पद असो वा नसो, मी प्रथम जनतेची सेवा करण्याला प्राधान्य देणार आहे. मात्र, पदासाठी कधीच कुणासमोर हात फैलावणार नाही, आमच्या रक्तातच तशी सवय नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde comment on bjps mlc list said i request to you all but for post i cant marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Crime News| धक्कादायक ! दोघांमध्ये ‘फाटल्या’नंतर रागाच्या भरात गर्लफ्रेन्डनं केला बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड हल्ला, डोळा कामातूनच गेला

Tadoba National Park | वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Vinod Tawde | माजी मंत्री विनोद तावडे यांचे अखेर पुनर्वसन ! भाजपने दिली मोठी जबाबदारी; देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

Dr. Amol Kolhe | राज्याच्या तिजोरीच्या सक्षमतेवर मुख्याध्यापक अन् शिक्षकांचे निर्णय अवलंबून – खासदार डॉ.अमोल कोल्हे (व्हिडिओ)

Sean Whitehead | दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ ऑल राऊंडरने अनिल कुंबळेला मागे टाकत एका इनिंगमध्ये घेतल्या 10 विकेट्स

Kranti Redkar | क्रांती रेडकरचा मंत्री नवाब मलिक यांच्यावर ‘घणाघात’, म्हणाल्या…