Pankaja Munde | गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला नवा संकल्प कराल का? 

0
183
Pankaja Munde | bjp leader pankaja munde emotional letter to all workers 12 dec gopinath munde birth anniversary
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची १२ डिसेंबरला जयंती असते. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये एक संकल्प द्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य? असे त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) या १२ डिसेंबरला कोणता संकल्प करणार हे मात्र अस्पष्ट आहे.

 

 

पंकजा मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हंटले आहे की, १२ डिसेंबर, ३ जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीनं होतो. याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांना जातं. माझ्या जीवनात तुमच्या एवढं सच्च अनोखं नातं कोणतंही नाही. प्रत्येक वर्षी सामूहिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी असे सामाजिक उपक्रम आपण घेतो. या कार्यक्रमासाठी अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती यांसारखे अनेक मान्यवर सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष न्याय दिन साजरे झाले. अनेक दुःखी कुटुंबाना तसेच रुग्णांना उपचारासाठी मदत केली. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नाही तर चुकीच्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पत्रात म्हंटले आहे.

कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर, नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपलुकीविना असणाऱ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरु, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं! या १२ डिसेंबरला एक संकल्प द्यावा म्हणते ऐकाल का? सोपा आणि साधा संकल्प कराल का साध्य? असं या पत्राच्या शेवटी मुंडे यांनी म्हंटले आहे. पंकजा मुंडे यांनी हे पत्र आपल्या ट्विटवर शेअर केलं आहे.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde emotional letter to all workers 12 dec gopinath munde birth anniversary

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SIM Cards New Rule | सिम कार्डबाबत नवा नियम जारी ! आपल्याकडे जादा सिम कार्ड आहेत का? तर मग ‘हे’ अनिवार्य असणार; जाणून घ्या

Crime News | धक्कादायक ! विष प्राशन करुन बँक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीची आत्महत्या, 7 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न; सुसाईट नोटमध्ये असं लिहिलं की…

Pune Crime | दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न ; पुणे स्टेशन समोरील घटना