Pankaja Munde | ‘मी मोठी नेता नाही पण….’ ! एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या शरद पवारांना पंकजा मुंडेंनी दिलं चोख उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  विरोधकांनी आता सरकार पाडण्याचे मुहूर्त जाहीर करण्याऐवजी विरोधकाच्या भूमिकेत काम करावे असा घरचा आहेर भाजपच्या राष्ट्रीय सचिव (BJP National Secretary) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला. यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना शनिवारी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असे म्हटले. शरद पवरांच्या या वक्तव्याला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP national president JP Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) दिल्लीला रवाना झाल्या आहेत.
यावेळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी त्यांना शरद पवारांच्या विधानासंदर्भात विचारण्यात आले असता त्यांच्या बोलण्याने आपण लहानही होत नाही आणि मोठ्याही होत नाही अशी प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, मी पवार साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण मोबाईलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे.
मी लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, शिकवलं पाहिजे.
तरीही ते असं म्हणाले असतील तर त्यामुळे मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच आहे.
ते आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यात काही वाद नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या भूमिकेचा अर्थ त्यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, आम्ही आता ज्या भूमिकेत आहोत त्यात सक्षमपणे काम केले पाहिजे.
ते करत देखील आहोत. कार्यकर्त्यांमध्ये जर आपण सत्तांतर होणार असा विचार निर्माण करत राहिलो तर काम करताना त्यांची पूर्ण ऊर्जा वापरली जाणार नाही.
त्यामुळे त्या भूमिकेत मी स्वत: शिरली आहे.
सरकार राहतंय की सरकार जातय हा विषय महत्त्वाचा नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

 

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उस्मानाबाद, मराठवाड्याचा दौरा केला त्यावेळी तुम्ही नव्हता यावर बोलताना तेव्हा माझी प्रकृती ठीक नव्हती.
देवेंद्र फडणवीसांनाही ते माहिती आहे. अन्यथा मी सर्व व्यासपीठांवर असते.
जिथे मला निमंत्रण असतं तिथे माझी उपस्थिती असते, असेही त्यांनी सांगितले.

 

Web Title : Pankaja Munde | bjp leader pankaja munde ncp sharad pawar delhi j p nadda meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

Clapping Therapy | टाळी वाजवा आणि रोग पळवा, जाणून घ्या ‘Clapping Therapy’ चे 9 अमूल्य फायदे

KNOW YOUR POSTMAN | डाक विभागाने लाँच केले ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप, एका क्लिकने मोबाइलवर येईल पोस्टमनची सर्व माहिती