Pankaja Munde | … तर मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत, असं वक्तव्य भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमत्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मी जनतेच्या मनात असेल तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेस (Congress) मध्ये वंशवादाचे राजकारण (Politics of Racism) सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद संपवत आहेत हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि मी देखील वंशवादाचं प्रतिक असल्याचे त्या म्हणाल्या. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही.

 

राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. मात्र, अलिकडे राजकारण हे करमणुकीचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Former PM Atal Bihari Vajpayee) आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नाही.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
कधी विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले.
ते सर्व अंदाज भाजप नेत्यांनी फेटाळले. अशातच पंकजा मुंडे यांनी बीडमधील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde said pm narendra modi wants to end my politics Marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandni Chowk | चांदणी चौकातील पूल 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions | पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार, मंत्रिमंडळ बठकीत महत्त्वाचे 14 निर्णय

Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…