Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहोचल्या पानपट्टीवर अन्… (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde | एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर भाजप नेत्या (BJP) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पान टपरीला भेट दिली आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचाही गराडा होता. त्या कार्यकर्त्याचा आग्रहाचा मान ठेवून पंकजा मुंडे थेट त्याच्या पान टपरीवर पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता. खरंतर त्यावेळी पंकजा यांनी स्वत: पानाचा विडा तयार करुन आस्वाद घेतला आहे.

 

राजकारणात सर्व सामान्य माणसांत मिसळणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पावलावर पाऊल टाकून पंकजा मुंडे यांनी देखील सामान्य लोकांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत आहे. दरम्य्यान, पंकजा मुंडे यांनी बीड शहरातील बशीरगंज चौकात असणाऱ्या शेख जमील यांच्या तारा पान सेंटरला (Tara Pan Center) भेट दिली. कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर पंकजा यांनी त्यांच्या पान सेंटरला भेट दिली. त्यावेळी त्यांना पान सेंटरमध्ये गेल्यावर स्वतः पान तयार करण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः पानाचा आस्वाद तर घेतलाच पण सोबतच्या सर्व सहकाऱ्यांनाही पान बनवून दिले.

व्हिडीओ पाहण्यासाठी आवश्य पोलीसनामाच्या फेसबुक पेजला भेट द्या (Watch Video On Policenama Facebook Page. Just Click Here)

 

दरम्यान, या प्रसंगाने उपस्थित गर्दीला पंकजा (Pankaja Munde) यांचे वडील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण आली. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Rajendra Muske), रमेश आडसकर (Ramesh Adskar), अक्षय मुंदडा (Akshay Mundada), सर्जेराव तांदळे (Sarjerao Tandale) आदी सोबत होते. दरम्यान, त्यावेळी पंकजा यांनी स्वतःच्या पानाचा विडा देखील बनविला. यामुळे त्यांच्या पानाच्या विड्याची, बीड जिल्ह्यात (Beed District) जोरदार चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp leader pankaja munde visit pan center in beed and

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाश आणि करणा कुंद्राच्या नात्यावर राखीचा पति रितेशने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला…

Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

Kangana Ranaut | कंगना रणावतच्या आयुष्यात कोण ‘खास’ची एन्ट्री, शेअर केली रोमँटिक पोस्ट