Pankaja Munde | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे पहिले ट्विट, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde | मोठ्या विलंबानंतर आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) आपला मंत्रिमंडळ विस्तार केला. शिंदे गटाच्या (Shinde Group) 9 तर भाजपाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु हा मंत्रिमंडळ विस्तार अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला आहे. एकीकडे मंत्रिमंडळात काही वादग्रस्त चेहर्‍यांची वर्णी लागल्याने टीका होत असतानाच काही पक्षांतर्गत बाबींमुळे सुद्धा हा मंत्रिमंडळ विस्तार चर्चेत आला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने या विषयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Pankaja Munde)

 

मात्र, शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन…. महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा… विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्वजण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना.‘ (Pankaja Munde)

 

 

शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची वणी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्या शपथविधी सोहळ्यालाच उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय, पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे (MP Pritam Munde) यांना स्थान मिळाले नाही.

 

पंकजा मुंडे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रणच नव्हते
की, त्याच कामानिमित्त बाहेर होत्या, की पंकजा मुंडे नाराज आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे.

 

Web Title :- Pankaja Munde | BJP leader pankaja mundes first tweet after maharashtra cabinet expansion said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | शिंदेंच्या मंत्रिमंडळात नसणार्‍यांना खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिवस’; ‘त्या’ आमदाराचा टोला

 

Facebook | 15 वर्षाच्या मुलीचे HIV पॉझिटिव्ह मुलाशी फेसबुकवर झाले प्रेम, प्रेमात स्वत: ला टोचून घेतले ‘एड्सचे इंजेक्शन’

 

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ