Pankaja Munde | पंकजा मुंडेंना मोदींबद्दल तसे म्हणायचे नव्हते, ओघाओघातून…, भाजपा आमदाराची ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे एक विधान सध्या खुप चर्चेत आहे. या वक्तव्यावरून शिवसेना (Shivsena) आणि इतर विरोधी पक्षांकडून भाजपावर (BJP) टीका केली जात आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीदेखील वंशवादाचे प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केले तर मोदींनीही मला संपवायचे ठरवले तरी ते संपवू शकत नाहीत. मात्र, आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्टीकरण दिले असून माझ्या वक्तव्याचा चुकीची अर्थ काढला आहे, असे म्हटले आहे. आता भाजपा आमदार संजय कुटे (MLA Sanjay Kute) यांनीही पंकजा यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

यावरून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. संजय कुटे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तसे विधान केलेले नाही. मी त्यांचे पूर्ण भाषण ऐकले आहे. त्या वंशवादावर बोलत होत्या.

 

आमदार संजय कुटे यांनी सांगितले की, त्या म्हणाल्या, जो माणूस सर्वसामान्य लोकांच्या मनात असतो, त्याला कोणीही संपवू शकत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो विषय असल्यामुळे तसे विधान जोडले गेले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मनात तसे काहीही नाही. एखाद्याच्या घरात वडील आणि मुलांनाही तिकीट दिले आणि जनतेने त्याला पाठिंबा दिल्यास वंशवाद म्हणता येणार नाही.

संजय कुटे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, पक्ष माझ्याच घरात चालणार.
मीच अध्यक्ष, त्यानंतर माझा मुलगा अध्यक्ष, पुढे त्याचा मुलगा अध्यक्ष याला वंशवाद म्हटले जाते.
भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वंशवादावर स्पष्ट भूमिका आहे.
पंकजा मुंडे यांना तसे म्हणायचे नव्हते. मात्र ओघाओघातून त्यांच्या तोंडून मोदी यांचे नाव निघाले. त्यामध्ये दुसरे काहीही नाही.

 

Web Title :- Pankaja Munde | bjp mla sanjay kute on panja munde comment on narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 1 लाख 62 हजारांची अफुची बोंडे (चुरा) जप्त

District Planning Committee (DPC) Pune | अजित पवारांना धक्का? पुणे जिल्हा नियोजन समितीवरील 18 सदस्यांचे पद रद्द

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…