धनंजय मुंडेंनी मृतांच्या जमिनी स्वत:च्या नावावर करून घेतल्या ; पंकजा मुंडेंचा गंभीर आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – धनंजय मुंडे यांनी मयत माणसाच्या नावावरील जमिनी जबरदस्तीने स्वत:च्या नावावर करून घेतल्या. तसेच त्यांनी कारखान्याच्या नावाने जमिनी लुबाडल्या. त्यामुळे त्यांच्यावर ४२० चे गुन्हे दाखल आहेत. याची चार्जशीट तयार होतेय. त्यामुळे धनंजय मुंडेंनी लोकांना शिकवू नये असा टोला पंकजा मुंडेनी लावला आहे.

माझ्या बाबतीत असो की प्रीतम मुंडे बाबतीत पण वैयक्तीक टीका करणे हे दुर्दैवी आहे. मी पक्षाची भूमिका म्हणून टीका करेल पण वैयक्तीक कधी करत नाही. पार्थ पवार यांच्या बाबत मला प्रश्न विचारले तेव्हा मी त्यांची खिल्ली उडवली नाही. त्यांचा अपमान केला नाही. मी पक्षाच्या भूमीके विरोधात राहील. वैयक्तीक कुणावरही निंदा नालस्ती करणार नाही. मात्र, आमचे बंधू यांची ती सवय आहे. असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

वैद्यनाथ कारखान्याची बदनामी केली जात आहे. त्यामुळे मला त्रास होत आहे. एकाही शेतकऱ्यांचा रुपया मी ठेवणार नाही. माझ्या आईच्या नावाची जमीन गहाण ठेवून शेतकऱ्यांचे पैसे दिले आहेत. वेळ पडली तर माझ्या स्वता:ची वैयक्तीक जमीन गहाण ठेवून शेतकऱ्यांचे पैसे देईन. यावर देखील विरोधकांनी टीका केली. मात्र, विरोधकांनी चार-पाच भाड्याचे कार्य़कर्ते कारखान्यावर पाठवून रेकॉर्डिंग करुन घेतलं. वैद्यनाथ कारखाना आगोदर त्यांच्याकडे होता. त्यांच्यामुळे कारखाना अडचणीत आला. आत्ता मी ७० टक्के पैसे दिले आहेत.