Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, पोलिसांचा लाठीचार्ज

Pankaja Munde | bjps first reaction to pankaja mundes speech the opinion expressed by the minister girish mahajan

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज दसरा मेळाव्यांची (Dasara Melava) धूम पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मुंबईत दसरा मेळावे होणार आहेत. या दोन्ही मेळाव्यांसोबत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा सावरगाव येथे मेळावा झाला. मेळाव्यात पंकजा मुंडेंनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भाषणानंतर मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रसंत भगवान बाबा (Bhagwangad) यांच्या सावरगाव घाट गावात पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासह खासदार प्रितम मुंडे (MP Pritam Munde), यशश्री मुंडे (Yashshree Munde), महादेव जानकर (Mahadev Jankar), आमदार मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar), शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) याच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पंकजा मुंडेंच्या आधी महादेव जानकर आणि प्रितम मुंडे यांची भाषणे झाली. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या भाषणानंतर मेळाव्यात मोठा गोंधळ झाला.

पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर मेळाव्याच्या ठिकाणी पोलीस (Beed Police) आणि भाजप समर्थकांमध्ये
बाचाबाची झाली. या बाचाबाची मुळे तिथे एक गोंधळ उडाला.
या गोंधळादरम्यान काही नेते व्यासपीठावरच अडकले होते.
यावेळी व्यासपीठावरुन पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, दोन पोलिसांमुळे गोंधळ उडाल्याची माहिती मिळत आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे.
या सर्व गोंधळात तीन तोळ्याचे लॉकेट आणि अनेकांची पाकिटे चोरीला गेली आहेत.

Web Title :- Pankaja Munde | dasara melava 2022 bjp pankaja munde bhagwan bhaktigad police lathicharge on supporters

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aurangabad Crime | औरंगाबाद पोलिसांचा फार्म हाऊसवर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे हरणारी लढाई लढताहेत का?

Andheri East Bypoll Election | अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा ‘हात’ शिवसेनेच्या पाठीशी, शिंदे गटाला दिले ओपन चँलेंज

Total
0
Shares
Related Posts