राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना पंकजा मुंडेंना विश्वासात घेतलं होतं ? प्रितम मुंडेंनी दिले ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. आता उद्या होणाऱ्या गोपीनाथ गडावरील समर्थकांच्या मेळाव्यात त्या मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी फेसबूक पोस्ट करत समर्थकांना एकत्र जमण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर राज्यातील पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय’ या नावाखाली सोशल मिडियावर सुरु केलेल्या मोहिमेमुळे मुंडे समर्थकात संभ्रम दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना वेट अ‍ॅण्ड वॉच असेच म्हणले आहे. तसेच पंकजा मुंडेंनी त्या उद्या आपली भूमिका जाहीर करतील असे म्हणले आहे.

भाजप नेत्यांमध्ये सध्या संभ्रम आहे. दिवंगत गोपनीथ मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात संघर्ष यात्रा काढली होती. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यात आला. त्याच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत भाजपने राज्यात सरकार स्थापन केले होते. राष्ट्रवादीचा हा पाठिंबा घेताना पंकजा मुंडेना विचारले होते का असा प्रश्न प्रितम मुंडेंना विचारण्यात आला होता, यावर उत्तर देताना प्रितम मुंडे म्हणाल्या की पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीतील काही निर्णय, बातम्या बाहेर लीक होत नाहीत.

प्रितम मुंडे म्हणाल्या की कोअर कमिटीचे निर्णय अतिशय कॉन्फिडेन्शिअल असतात. क्लासिफाईड इन्फॉरमेशन ज्याला आपण म्हणतो. मुंडे साहेबांच्या संस्काराप्रमाणे आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो. पक्षातील कामासंदर्भात आम्ही प्रोफेशनल आहोत. ज्याप्रमाणे कोअर कमिटीच्या बैठकीला मी जाऊ शकत नाही त्याच प्रमाणे बैठकीतील बातम्या देखील बाहेर लीक होत नाहीत. पक्षाच्या संसदीय कामकाजाचा आम्ही सन्मान करतो, अवमान होईल असे कृत्य आम्ही करत नाही. मी बहीण आहे म्हणून घरी येऊन त्या माझ्याशी कोअर कमिटीतील मुद्यांची चर्चा करतील येवढे इममॅच्युरल वातावरण आमच्याकडे नाही.

यावेळी विचारलेल्या प्रश्नावर सावधगिरी बाळगत प्रितम मुंडेनी उत्तर दिले की, “थोडसं राजकारण तर मी शिकलेच असेल, दुसरी टर्म आहे खासदारकीची.”

Visit : policenama.com