‘त्या’ फेसबुक पोस्टबद्दल पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून वर्तुळामध्ये रंगत आहे. मात्र आता स्वत: पंकजा मुंडेंनी सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, भाजप सोडणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. पक्षावर दबाव टाकण्यासाठी मी हे करत आहे, असा आरोप होत आहे. मात्र, हे देखील सत्य नाही, असे त्यांनी सांगितले.

मला आता घर बदलायचं आहे. मी म्हटलं होतं 12 डिसेंबरला बोलेन, मला आत्मचिंतनासाठी आणि स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवा आहे. तो मला दिलाच पाहिजे. आताच त्याच्यावर फार भाष्य करणं योग्य होणार नाही. मी दरवर्षी गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेते. काही वृत्तपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या छापल्या. त्यामुळे मी फारच दु:खी झाले असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मी मुख्यमंत्री होणार अशा प्रकारच्याही बातम्या आल्या होत्या.

निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी सभा घेतल्या. कधीही कोणत्याही पदासाठी लाचारी स्विकारली नाही. कधी कुठलं पद स्वीकारण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. मला आत्मचिंतनाची आणि आणि आपल्या लोकांशी काय बोलायचं आहे, यासाठी वेळ नक्कीच दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Visit : policenama.com