‘त्यांची’ तोंडं आता परळीच्या महिला भगिनीच ‘बंद’ करतील : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी येथे आयोजित उमेद व पशू संवर्धन विभागाच्या वतीने बचत गटांच्या महिलांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. लुच्चे लफंगे यांचं तोंड आता परळीच्या महिला भगिनीच बंद करतील अशा शब्दात पंकजा यांनी धनंजय यांच्यावर निशाणा साधला आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर सुद्धा उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही मला लक्ष्मी म्हणता मी तुम्हाला लक्ष्मी म्हणून नमन करते. लक्ष्मी ही स्वच्छ कारभार करणाऱ्यालाच आशीर्वाद देते. यावेळी बचत गटातील महिलांना दुधाळ गायीचे वाटप करण्यात आले.

पंकजा पुढे म्हणाल्या, तुम्हीं मला ताकत दिली तर तुम्हाला ताईच्या पाठिमागे रहावं लागेल. भविष्यात मी सेवा करेल, गोठयातली गाय आणि घरातली माय सुखी रहावी यासाठी काम करेल.

राष्ट्रवादीवर टीका करताना पंकजा मुंडे म्हणाल्या निवडणुकीच्या दिवसात तुमच्या नवऱ्याला घड्याळ वाल्यानी जर दारू, मटण खायला घातलं तर घरी आल्यावर त्यांना सांगा भाकरी पण दारुतच चुरून खा आणि ती पण स्वतः बनवा.

येत्या विधानसभा निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष पहायला मिळणार आहे. त्याच अनुषंगाने पंकजा मुंडेनी तयारी सुरु केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –