Pankaja Munde In Pune | ‘कटेंगे तो बटेंगें’ ही आमच्या पक्षाची भुमिका नाही; भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा ‘कट्टर हिंदुत्ववादी’ कार्यकर्त्यांना संदेश !

Pankaja Munde In Pune | 'Katenge to Batenge' is not the role of our party; BJP leader Pankaja Munde's message to 'radical Hindutva' workers!

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pankaja Munde In Pune | ‘कटेंगे तो बटेंगे’ हा मुद्दा काय आहे? कोणी असे मेसेज समाज माध्यमांवर टाकतो. ही आमच्या पक्षाची भुमिका नाही. कोणीही जातीधर्माचे राजकारण करू नये. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकास कामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या (BJP Leader) आमदार पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत देत किमान निवडणुकीपुरता का होईना भाजपने ‘कट्टर हिंदुत्ववादी’ मुद्दयाला बाजूला सारल्याचे संकेत दिले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

भाजपच्या पश्‍चिम महाराष्ट्र मिडीया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी खासदार प्रितम मुंडे (Pritam Munde), शहरअध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), भाजपचे प्रदेश प्रवक्ता आणि महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर (Amol Kavitkar) आदी पदाधिकारी उपस्थित होते. पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलणार, जाती धर्मात तेढ वाढवणार असे फेक नरेटीव्ह वापरले होते. महाराष्ट्रात त्याचा आम्हाला नक्कीच फटका बसला. परंतू आता जनतेला वस्तुस्थिती लक्षात आल्याने विरोधकांचे फेक नरेटीव्ह आता चालणार नाही.

भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘बटेंगे तो कटेंगे’ असे मेसेज समाज माध्यमांवर प्रसिद्ध करत विशिष्ट समुदायाला लक्ष करत असल्याबाबत मुंडे यांना विचारले. यावर त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे काय आहे? काहीजण समाज माध्यमांवर असे मेसेज टाकतात, ही आमच्या अथवा आमच्या मित्र पक्षांची भूमिका नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या काळात आणि महायुती सरकारने राज्यात राबविलेल्या योजना आणि विकासकामांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमच्यासाठी सर्व नागरिक समान आहेत. समाजात दुही पसरविण्याची आमची भुमिका नाही, असे स्पष्ट करत त्यांनी ‘कट्टर हिंदुत्ववादी’ कार्यकर्त्यांना एकप्रकारे संदेश दिला.

पुणे जिल्ह्यातील २१ पैकी १८ जागांवर महायुतीचे आमदार होते. या निवडणुकीत सर्वच जागांवर विजय मिळविण्यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या बळावर जनतेने तिसर्‍यांदा त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविले आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या कामाच्या बळावर पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा दावाही मुंडे यांनी यावेळी केला.

Total
0
Shares
Related Posts