“धनंजय मुंडे तोडीपाणी करणारे नेते” – पंकजा मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इ.व्ही.एम मशीन मध्ये असलेला फसवा कारभार दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांची हत्या केली असा खळबळ जनक दावा एका अमेरिकन हॅकर ने केला असता यावर माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे यांनी अतिशय शांतपणे या प्रश्नाचं उत्तर देत त्या म्हणाल्या की मी हॅकर नाही, मी एक कन्या आहे, यावरच आज माध्यमांशी बोलताना पंकजा म्हणाल्या कि या देशात आपण सीबीआय, न्यायालय यांना महत्व देतो कि बाहेरून आलेल्या हॅकर वर विश्वास ठेवतो. त्यावर त्यांना उपप्रश्न विचारण्यात आला कि एकनाथ खडसे आणि दाऊद चे संबंध असल्याचा एका हॅकर ने दावा केला होता तेव्हा त्यांच्या पाठीशी पक्षाकडून कुणीच उभं राहील नाही. त्यावर त्यांची चौकशी त्या कारणावरून झालीच नाही असं पंकजा म्हणाल्या.

शिवसेनेसोबत युती व्हावी का
शिवसेनेसोबत युती व्हावी नाही ती होणारच, कारण आघाडी होतेय सत्ता उथळून टाकण्यासाठी आणि आमची युती होणार यांचे उद्देश धुडकावून लावण्यासाठी आणि परत एकदा भाजपचाच पंतप्रधान या देशावर विराजमान करायचा असे आमचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे, युती होईल का असं विचारण्यापेक्षा युती होणारच असं म्हणायला हरकत नाही.

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का
हो नक्कीच आवडेल, मी कधी कधी स्वतःला मुख्यमंत्री समजते. पण मी किंग होऊ इच्छित नाही मी किंगमेकर आहे. आणि माझ्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यामध्ये विश्वासपूर्ण संबंध आहे त्यामुळे, बाहेर लोकांमध्ये जो समज आहे तो पूर्णपणे खोटा आहे. भविष्यात पक्षाने मला मुख्यमंत्री केलं. तर मी पक्षाचे आदेश नक्की मानेल.

धनंजय मुंडे स्थानिक राजकारणात पुढे आणि तुमचा पराभव होतो असं का हे विचारलं असता ते स्थानिक राजकारणातच जिंकू शकतात मुख्य राजकारणात त्यांचा पराभव होणारच. तसेच यावेळी धनंजय मुंडे यांनी तुमच्यावर चिकी किंवा अन्य काही योजनांमध्ये जेंव्हा धनंजय मुंढे तुमच्यावर आरोप करतात तेव्हा दुःख होत यावेळी त्या म्हणाल्या निश्चित होत. त्यांच्या आरोपामुळे मी भ्रष्टाचारी नसताना मला भ्रष्टाचारी झाल्यासारखं वाटत. असं हि पंकजा मुंढे म्हणाल्या. यावर न थांबता त्यांनी त्यांच्या पदाचा चांगला फायदा घ्यायला पाहिजे होता, पण आज धनंजय तोडीपाणी करतो म्हणून प्रसिद्ध आहे. अशी टीका पंकजा यांनी केली. यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया काय हे बघणं महत्वाचं ठरेल.