Pankaja Munde | ’17 ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल’ – गिरीश महाजन

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाल्यानंतर आता 17 ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन (Legislative Session) सुरु होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मंत्र्यांचे खाते वाटप होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जळगाव (Jalgaon) येथे व्यक्त केला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची नाराजी असल्याचे सांगत अजून 23 मंत्री शपथ घेणे बाकी आहे. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची नाराजी असण्याचा प्रश्नच नाही. पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मोठेपद मिळू शकते, असे गिरीश महाजन म्हणाले.

 

गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी (दि.12) सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात रखडलेल्या विषयावर टीका केली. अडीच वर्षात खुंटलेला विकास डबल इंजिनच्या सरकारमुळे दुप्पट वेगाने होणार आहे. आता मंत्रीपद मिळाल्याने मोठी जबाबदारी वाढली आहे. राज्यात सिंचन, रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न विविध समस्या आहेत. सोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

 

स्वातंत्र्य दिन (Independence Day) अवघ्या तीन दिवसांवर आला आहे.
या दिवशी ध्वजारोहण (Flag Hoisting) नेमके कोणाच्या हस्ते होणार याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की,
जळगाव येथे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते होणार आहे तर माझ्या हस्ते नाशिक येथे ध्वजारोहण होणार आहे.
ध्वजारोहण तसे पालकमंत्र्यांच्या (Guardian Minister) हस्ते होत असते.
त्यामुळे गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पद जवळपास निश्चित झाल्याचे संकेत दिले आहेत.

 

मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची नाराजी असल्याविषयी महाजन म्हणाले, अजून 23 शपथ घेणे बाकी आहे.
त्यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही.
कदाचित त्यांना मोठे पद मिळू शकते, असे महाजन म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई झाली हे मान्य आहे असे सांगत त्यांनी नाराजी असतेच मात्र ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील,
असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

 

Web Title : –  Pankaja Munde | ministry given before august 17 pankaja munde will get big post in eknath shinde govt disclosure of girish mahajan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा