Pankaja Munde | भाजप पंख छाटतं, राष्ट्रवादीच्या नेत्याची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) आले. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान न दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पंकजा मुंडे यांना आधी विधान परिषद (Legislative Council) आणि आता मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. यातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनीही दुजोरा दिला आहे.

 

अमोल मिटकरी म्हणाले, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुण्याईनं भाजप (BJP) पक्ष वाढला. पण त्यांच्या मुलीचा पराभव करण्यात आला. रोहिणी खडसेंना (Rohini Khadse) हे लवकर कळलं. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही ते कळायला हवं. आता 12 आमदारांची यादी राज्यपाल (Governor) जाहीर करतील, त्यात पंकजांचं नाव नाही. पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख भाजप कसे छाटतो हे यावरुन दिसतं. रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या. तसेच पाऊल पंकजा मुडेंनीही उचलावं. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली.

 

मिटकरींनी चांगला विचार मांडला असेल तर..

गोपीनाथ मुंडे हे वेगळ्या पक्षात असले तरी त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आणि समाजकारणात वेगळी ओळख आहे. आमचे अनेक वर्षांचे संबंध होते. जरी विरोधक असला तरी वैयक्तिक संबंध पाळले पाहिजे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र आता कटुता वाढताना पाहायला मिळते हे दुर्दैवी आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. जर मिटकरींनी चांगला विचार मांडला असेल तर पक्ष जरुर त्याचा विचार करेल. पंकजा मुंडे कुठल्याही पक्षात राहिल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा आणि प्रेम कायम असेल असं खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या.

 

भाजपात अंतर्गत वाद नाही – गिरीश महाजन

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वक्तव्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना (Shivsena) कुणाला काहीही म्हणू द्या, भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही.
पंकजा मुंडे नाराज आहेत. पंकजा या पक्षात जाणार तिथे जाणार असा कुठेही विषय नाही. हे सगळं कपोकल्पित आहे.
पण मनातील खेळ सुरु असल्याचे सांगत गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोला लगावला.

 

Web Title : –  Pankaja Munde | ncp mlc amol mitkari and supriya sule offered bjp leader pankaja munde to join ncp girish mahajan targeted ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा