प्रेम करणार नाही ! ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त शाळेतील मुलींना दिली शपथ, पंकजा मुंडेंनी उपस्थित केले प्रश्न

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अमरावती येथील शाळेतील मुलींना प्रेम आणि लव्ह मॅरेजच्या विरोधात शपत ग्रहण करायला लावल्याने नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. ट्विटद्वारे फक्त मुलींनीच का शपत घ्यावी ? असा सवाल पकंजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्यात पंकजा मुंडे नेमकं ट्विटमध्ये
अमरावतीतील चांदुर येथील शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ हा कमालीचा विचीत्र प्रकार घडला..शपथ मुलींनाच का ? आणि ती ही प्रेम न करण्याची… असा सवाल यावेळी पंकजा यांनी उपस्थित केला आहे.

त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही ,देणार कोणावर ऍसिड फेकणार नाही ,जिवंत जाळणार नाही वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार असे देखील पंकजा आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

अमरावतीच्या एका शाळेमध्ये व्हेलेंटाईन डे च्या दिवशी विद्यार्थिनींना प्रेम करणार आणि प्रेम विवाह करणार नसल्याची शपत देण्यात आली. आज व्हेलेंटाईन डे चे औचित्य साधून ही शपत देण्यात आली होती.

कशी होती नेमकी शपत
यावेळी शाळेतील मुलींनी शपत घेतली की, मी शपत घेते मला माझ्या आई वडिलांवर पूर्ण विश्वास आहे यामुळे माझ्यासमोर होणाऱ्या घटना लक्षात घेऊन मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही. त्याचप्रमाणे हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही. भावी आई म्हणून मी माझ्या भावी सुनेकडून देखील हुंडा घेणार नाही. त्याचप्रमाणे मुलींसाठी हुंडा देखील देणार नाही. अशा प्रकारची शपत मुलींना शाळेत देण्यात आली. तसेच यावेळी विद्यार्थिनींनी हिंगणघाट येथील महिलेला श्रद्धांजली देखील अर्पण केली.

3 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमवेड्याने महिलेने त्याला नकार दिल्याने पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. 10 फेब्रुवारीला पीडितेने ऑरेंज सिटी हॉस्पिटल मध्ये अंतिम श्वास घेतला होता.