सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde On CM Eknath Shinde | राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. तर दुसरी कडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण कायम ठेऊन सरकारची कोंडी केली आहे. तर मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देले आहे. शिंदे यांच्या आश्वासनावर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे. (Pankaja Munde On CM Eknath Shinde)
शिवशक्ती परिक्रमाच्या निमित्ताने पंकजा मुंडे सांगली मध्ये आल्या होत्या. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरक्षणाच्या घोषणेवर टीका केली. कोणीतरी घोषणा करुन, आरक्षण मिळणार नाही, संवैधानिक (Constitutional) मार्गाने आरक्षण द्यावे लागेल, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करुन योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde On CM Eknath Shinde)
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे.
अभ्यासक कमेटी नेमली पाहिजे मात्र यात राजकीय हस्तक्षेप असू नये.
यामधील खरं काय आहे, हे निर्भिडपणे परिस्थिती मांडली पाहिजे. मराठा समाजाला विश्वासात घेऊन आरक्षण दिले पाहिजे.
ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देणे शक्य नाही. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal),
नाना पटोले (Nana Patole) आणि माझी भूमिका स्पष्ट आहे. आरक्षण द्ययला लागले,
कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) द्यायला लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात आरक्षण आहे.
कुणबी म्हणून दिले तर ते ओबीसी मधून होईल, असेही मुंडे म्हणाल्या.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा