Pankaja Munde On Ketaki Chitale Topic | केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘पवार साहेबांनी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde On Ketaki Chitale Topic | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) आक्षेपार्ह शब्दांत केलेल्या टिपण्णीमुळे राज्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. याप्रकरणी केतकी चितळेला अटक करण्यात आली. सध्या तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान आता भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Pankaja Munde On Ketaki Chitale Topic)

 

”केतकी चितळे एक वॉर्निंग देऊन सोडून द्यावं,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. ”शरद पवार हे मोठे नेते आहेत, केतकीच्या वयाचा विचार करता एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं,” असं मत पंकजा मुंडे यांनी यांनी व्यक्त केलं आहे.

 

”सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हा जरी व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असला तरीही सर्वांचा सन्मान झाला पाहिजे. टीका जरी करायची असली तरीही बिभत्सपणे करु नये. त्या पोस्टमध्ये बिभत्सपणा मला आढळला, यासाठी मी त्याची निंदाच करते. मी राजकारण लहानपणापासून जवळून पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता. लोकं पेपर मध्ये लिहायची. तेव्हाही अनेकदा भाषा घसरायची.” असं पंकजा मुंडे यांनी यांनी म्हटलं आहे.

पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, ”आम्ही अनेकदा बाबांना विचारायचो की अशा भाषेत लिहीलेले तुम्ही सहन कसे करता? तेव्हा ते म्हणायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतू आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वेगळा अर्थ काढला जातो आहे.
पण, सध्या तीचं वय पाहता तिला एक वॉर्निंग देऊन सोडून द्यायला हवं. पवार साहेब मोठे नेते आहेत,” असं त्या म्हणाल्या.

 

Web Title :- pankaja munde reaction on ketaki chitale topic say sharad pawar only give her warning because of her age

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO Update | UAN मेंबर पोर्टलवर प्रोफाईल पिक्चर अशाप्रकारे करू शकतात अपलोड, याशिवाय होणार नाही ई-नॉमिनेशन

 

Pune Crime | मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; नराधमास 20 वर्षे सक्तमजुरी

 

Pune Municipal Corporation Election 2022 | प्रभाग 28 आणि 40 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण उडाले; प्रभाग क्र. 42 आणि 47 मध्ये पडले