Pankaja Munde On Maratha Reservation | ‘आता नुसती आश्वासनं नकोत’ मराठा आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचे विधान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde On Maratha Reservation | भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रेला’ चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंकजा मुंडे पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जालना येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी (Maratha Reservation Protest) नागरिक आठ दिवसांपासून बसून आहेत. परंतु, अद्यापर्यंत राज्य सरकारकडून (State Government) ठोस पावलं उचलली जात नाहीत, असे विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, घटना अत्यंत दुर्दैवी असून तिची सोखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. (Pankaja Munde On Maratha Reservation)

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, जालन्यातील घटनेची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता नुसती आश्वासनं नकोत, तर पोटातून भावना करुन एखाद्याने नेतृत्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे ठोक ताळे सांगणारा आश्वासित असा चेहरा समोर आला पाहिजे, अशी भूमिका मांडत पंकजा मुंडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. (Pankaja Munde On Maratha Reservation)

बॉम्बेचं मुंबई होऊ शकतं तर…

देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळे (India Alliance) सत्ताधारी केंद्र सरकारकडून (Central Government)
सर्व ठिकाणी भारत (Bharat) करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. यावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्या आरोप प्रत्यारोप
होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही इंडियात राहता की भारतात?
आपलं नाव भारत आहे आणि इंडिया हे झाले आहे. बॉम्बेचं मुंबई होऊ शकतं, तर इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर
काही तरी निर्णय होईल. तसेच आपण दोन्हीमध्ये राहत असून त्या काळात कॉलनियन लोकांनी दिलेलं नाव आहे,
अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मार्केटयार्ड: चेस्टामस्करीचा राग आल्याने मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न