Pankaja Munde | ‘अनेक बंदुका माझ्या खांद्यावर…’, पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या पक्षांतरासंदर्भात देखील तर्कवितर्क लावले जात आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीवर विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. तर दुसरीकडे भाजप नेते पंकजा मुंडे नाराज नसल्याचे सांगत आहेत. अशातच आता स्वत: पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) भाषण करताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मला भूमिका घेण्याची वेळ आली तर अशी सर्व प्रसारमाध्यमांना बोलवून घेईल आणि त्यांच्यासमोर बसून बिनधास्तपणे भूमिका जाहीर करेन. कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेऊन बंदूक चालवण्याऐवढे खांदे अद्याप तरी मला मिळाले नाहीत. मात्र माझ्या खांद्याची रुंदी इतकी आहे की, अनेक बंदुका माझ्या खांद्यावर विसावण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या बंदुकांना मी माझ्या खांद्यावर विसावू देणार नाही.

मी गोपीनाथ मुंडे एवढी मोठी नाही

पंकजा मुंडेचं महात्म्य सांगितलं जातं, कमीपणा सांगितला जातो.
मी गोपीनाथ मुंडेंएवढी (Gopinath Munde) मोठी नाही म्हणतात. हो बरोबर आहे.
मला गोपीनाथ मुंडेंसारखं म्हणता तेही बरोबर आहे. गोपीनाथ मुंडे पुढे जाल असा आशीर्वाद देतात तेही मी
नम्रपणे स्विकारते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी माझ्या भूमिकेशी ठाम

मी राजकारणात (Maharashtra Politics News) जी भूमिका घेईन, ती छातीठोकपणे घेईन. मी आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका जाहीरपणे मांडल्या त्याच भूमिकांशी मी ठाम आहे.
विरोधकांना किंवा माध्यमांना संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिली नाही.
अनेक जण निवडणूक हरले, मात्र त्यांना संधी दिली गेली. मागील चार वर्षात दोन डझन आमदार-खासदार झाले.
त्याला मी पात्र होत नसेल तर लोक चर्चा तर करणारच. ती चर्चा मी ओढावलेली नाही, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Advt.

अमित शहांकडे वेळ मागितला आहे

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, असं असलं तरी माझ्या मनात गाढ विश्वास आहे.
अमित शाह (Amit Shah) माझे नेते आहेत. मी अमित शहांची भेट घेणार आहे.
त्यांच्याकडे वेळ मागितला आहे. मी त्यांच्याशी मनमोकळं बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title :   Pankaja Munde | pankaja munde comment on current politics bjp speculations Maharashtra Politics News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘… यापेक्षा थुंकणं चांगलं’, संजय राऊतांच्या विधानावर अजित पवारांची सयंमी प्रतिक्रिया, म्हणाले- ‘ती मोठी माणसं, आम्ही त्यांचा…’

Shasan Aplya Dari – Pune News | पर्वती मतदारसंघात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

Aam Aadmi Party (AAP) Swaraj Yatra In Pune | भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणेशाहीमध्ये अडकलेला पक्ष ! जनतेला खरा पर्याय आम आदमी पार्टीच देऊ शकते – आप राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया