Pankaja Munde | तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणतंय का? पंकजा मुंडे म्हणाल्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – तुमच्या राजकारणात जास्तीची चहापावडर टाकून कोणी कडवटपणा आणत आहे का? असा प्रश्न भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारला असता त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत. तसेच विधान परिषदेत (Legislative Council) आणि मंत्रिमंडळात (Cabinet) स्थान न मिळाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, राजकारण कसे असते, त्यात सर्व गोष्टींचे व्यवस्थित मिश्रण पाहिजे. जसे चहामध्ये चहापत्ती, साखर, थोडी विलायची, थोडे सुंठ किंवा आद्रक टाकले पाहिजे. कोणी दालचिनी टाकते. ते मिश्रण परफेक्ट झाले तर चहा परफेक्ट बनतो. एखादा दुसरा पदार्थ बनवणे सोपे, पण चहा बनवणे इतके सोपे नाही. हेच राजकारण आणि चहातील साम्य आहे.

तुमच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून कोणी चहापत्ती जास्त टाकत आहे का?
असे विचारले असता मुंडे म्हणाल्या, मला स्ट्राँग चहा आवडतो. चहा चहा आहे, तो दुधासारखा कसा प्यायचा.
त्यामुळे मला थोडा स्ट्राँग चहा आवडतो. जे आपल्या वाट्याला येते त्याची चव आपल्यासारखी बदलून घ्यावी लागते.

मुंडे पुढे म्हणाल्या, ताटात काही चांगले पडले नाही, तर मी किरकिर करत नाही. मीठ कमी असेल तर लोणचे तोंडी लावते. तिखट कमी असेल तर चटणी खाते. तसेच जीवनातही काही कमी पडले, तर त्याची चव कशी व्यवस्थित करायची हे मला माहिती आहे.

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde comment on political opponent and her politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा