Pankaja Munde | भगवान भक्तीगडावर दसर्‍याची जोरदार तयारी, पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन, म्हणाल्या – तयारीला लागा…

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde | शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याची (Dasara Melava) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता बीडमध्ये भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या मेळाव्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे भगवान भक्तीगडावरील (Bhagwan Bhaktigarh) मुंडे यांचा मेळावा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावर्षी हे संकट नसल्याने मोठ्या प्रमाणात मेळावा साजरा करण्यात येणार आहे.

 

भगवान भक्तीगडावरील मेळाव्यासाठी संत भगवान बाबा (Saint Bhagwan Baba) यांचे जन्मगाव असलेल्या सावरगावमध्ये मेळाव्याची मोठी तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या तयारीचा एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओत त्यांनी म्हटले होते की, कोरोनामुळे अधुरे राहिलेले काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या दिवसाच्या प्रतिक्षेत…तो दिवस आपला…एक अनोखा दिवस…कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय ???..तुम्हाला तर माहीत आहेच…लागा तयारी ला.

 

नवरात्रीच्या (Navratriutsav) पार्श्वभूमीवर आजही पंकजा मुंडे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी समर्थकांना आवाहन केले आहे की, दसरा म्हणजे, आपल्या स्वाभिमानाचा दिवस, आपल्या आवडीचा दिवस, आपल्या सर्वांच्या शक्ती आणि भक्तीच्या संगमाचा दिवस. सर्वांनी दसर्‍याच्या तयारीला लागा आणि दसर्‍याच्या दिवशी मेळाव्यात भेटूया.

 

भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) हयात असताना दसरा मेळावा भगवान गडावर होत असे.
त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत पंकजांच्या मेळाव्याला विरोध करण्यात आला होता.
तेव्हापासून हा मेळावा सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो.

 

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde get ready for dussehra meet at bhaktigarh pankaja mundes appeal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; अब्दुल सत्तारांची माहिती

Pune School Bus Accident | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 44 विद्यार्थी जखमी

Sanjay Raut | दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही न्यायालयीन कोठडीतच, न्यायालयाने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली