Pankaja Munde | शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? पंकजा मुंडेंचं सूचक विधान, चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Pankaja Munde | मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भुंकप झाला. अनेक वर्ष असलेली भाजप आणि शिवसेनेची (BJP And Shiv Sena) युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झालं. सर्वाधिक जागा मिळून देखील भाजप सत्तेपासून दूर राहिला. तेव्हापासून भाजपा-शिवसेना पुन्हा एकत्र येणार असे भाकीत अनेकवेळा होताना दिसत आहे. नागपूर दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. यानंतर आता भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही सुचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

 

राऊत यांच्या भूमिकेवर माध्यमांनी बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान त्यानंतर त्यांनी केलेल्या सूचक विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आत्ता यावर मला टिप्पणी करता येणार नाही. पक्षातील प्रदेशाध्यक्ष आणि निर्णय घेणारे लोक याबाबत निर्णय घेतील. पण राजकारणात कधीही कोणतीही भविष्यवाणी बदलू शकते असं माझं मत आहे”, दरम्यान, पंकजा मुंडेंनी स्पष्टपणे होकार दिला नसला तरी स्पष्टपणे नकारही दिला नसल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या प्रतिक्रियेवरुन राजकीय वातावरण रंगलं असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपुर्वी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युती करण्याबाबत प्रस्ताव दिला.
एमआयएमला देखील महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे,
असं म्हणत विरोधकांनी त्यावरून टीका केली असताना शिवसेनेकडूनही विरोधकांची चाल असल्याचं टीकास्त्र केलं जातं आहे.
या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या विधानामुळे एक नवी चर्चा रंगली आहे.

 

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde hints at bjp shivsena coming together again on sanjay raut statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी ! दोन नेत्यांच्या शाब्दिक संघर्षात अजित पवार म्हणाले…

 

Madhuri Dixit Gorgeous Look | वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा माधुरी दिक्षित दिसते इतकी सुंदर, पाहा व्हायरल फोटो

 

Eknath Khadse | ‘1993 ला बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईतील हिंदू सुरक्षित राहिला’ – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे

 

Mouni Roy Superhot Look | पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये आरशा समोर स्वत:ला पाहत राहिली मौनी रॉय, पाहा व्हायरल फोटो

 

South Actress Without Makeup Look | पडद्यामागं मेकअपविना अशा दिसतात ‘या’ काही प्रसिद्ध साऊथच्या अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हालाही बसेल मोठा धक्का